प्रतिनिधी, सातारा : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मशाल हे चिन्ह देण्यात आलेले आहे. त्यामुळे साताऱ्यातील आंदोलन मॅन समजल्या जाणाऱ्या शिवसेनेचे उपशहर प्रमुख गणेश अहिवळे यांनी हातात मशाल घेऊन संपूर्ण सातारा शहराला 5 किलोमीटरची धावत प्रदक्षिणा घातली आहे. ही मशाल जोपर्यंत अंधेरीच्या पोट निवडणूकीचा निकाल लागत नाही तोपर्यंत अशीच धगधगत राहणार असल्याचे गणेश अहिवळे यांनी सांगितले आहे. रात्री अकरा वाजता त्यांनी संपूर्ण सातारा शहराला प्रदक्षिणा घातली आहे.
