जनतेज न्युज

हत्तीचे हस्ती दंत तस्करी करणारी टोळी गजाआड.. तब्बल 20 लाखाचे दोन हस्ती दंत ताब्यात

प्रतिनिधी, सांगली : हत्तीचे हस्ती दंत तस्करी करणारी टोळी गजाआड करण्यात आली आहे. तब्बल 20 लाखाचे दोन हस्ती दंत पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. सांगलीच्या कवठेमहांकाळ पोलिसांनी ही कारवाई केली आहे. यामध्ये चार जणांना अटक केली आहे. कवठेमहांकाळ पोलिसांना गोपनीय माहितीमार्फत बातमी मिळाली. खरशिंग ते दंडोबा डोंगराकडे जाणाऱ्या रस्त्यालगत गिरनार तपोवन मठाच्या येथे झाडाझुडपात हत्तीचे हस्त दंत घेऊन थांबलेले आढळून आले. कवठेमहांकाळ पोलिसांनी सापळा रचून या चार आरोपींना अटक केली आहे. कोल्हापूर येथून हस्ती दंत घेऊन येणारे दोन आरोपी आणि सांगली मधील खरेदीदार दोन आरोपी असे चार आरोपींना पोलिसांनी अटक करून त्याच्यावर वन्य जीव कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. सांगली, कोल्हापूर, आणि कर्नाटक मध्ये तपास करून आणखी कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस उपअधीक्षक मनीषा डुबले यांनी सांगितले. तर राहुल रायकर, बालाजी बनसोडे, हे दोघे कोल्हापुर मधील तर कासीम काझी, मिरज तर हणमंत वाघमोडे हा कर्नाटक मधील रहिवासी आहेत.