प्रतिनिधी, उसमानाबाद : राज्य शासनाच्या वतीने शेतकऱ्यांना अन्न सुरक्षा योजने अंतर्गत अनुदानावर हरभरा बियाणे दिले जात . उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाकडून ४ हजार क्विंटल विवीध जातीचे हरभरा बियाणे कृषी कार्यालयाकडे पोहच केले असुन यात आधुनिक फुले विक्रम , फुले विक्रांत अशा जातीचा समावेश असल्याची माहिती महाबीजचे जिल्हा व्यवस्थापक राजु माने यांनी दिली . शासकिय परवाणे कृषी कार्यालय व कृषी साह्यक यांच्याकडे दिले असुन शेतकऱ्यांनी महा डिबीटी पोर्टलवर नोंदनी करून याचा लाभ घ्यावा असे अवाहन श्री माने यांनी केले आहे .
