जनतेज न्युज

संगमनेरच्या साकुरच्या सतोबा देवाच्या यात्रेला हाजारोंची गर्दी; उत्सव उत्साहात संपन्न

प्रतिनिधी, अहमदनगर : संगमनेर तालुक्यातील साकुर येथे चितळकर वस्ती वरती धनगर बांधवा कडून सतोबा देवाची यात्रा उत्सव व घोंगडी पूजन उत्सव अतिशय उत्साहात पार पडला यावेळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते गेल्या दोन वर्षापासून करुणा महामारीच्या प्रादुर्भावामुळे सणावर बंदी असल्यामुळे यात्रा उत्सव साजरा करता आला नाही पण यावर्षी अतिशय उत्साहात यात्रा उत्सव पार पडला यामध्ये धनगर बांधवांनी आपल्या पारंपारिक नाच गाण्यावर नाच करत आपली श्रद्धा प्रकट केली तसेच पारंपारिक पद्धतीने सतोबा देवयात्रा व घोंगडी पूजन पार पडली यावेळी महिलावर्ग तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता अतिशय उत्साहात हा यात्रा उत्सव तोंडे परिवार व चित्रकार परिवाराच्या तर्फे साजरा करण्यात आला. सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील सतोबा देवाचे पूजा अर्चना धनगर बांधव आपल्या पारंपारिक पद्धतीने साजरी करत असतात.