जनतेज न्युज

जिल्हा परिषद समोर इगतपुरी तालुक्यातील दरेवाडी येथील विद्यार्थ्यांचे अनोख आंदोलन सुरू ; दप्तर घ्या,बकऱ्या द्या… अशी घोषणा यावेळी विद्यार्थी देत आहेत

प्रतिनिधी, नाशिक : या अनोख्या आंदोलनाने सर्वांचे लक्ष वेधून घेतल आहे. हे आंदोलन कुठल्या कामगार युनियन किंवा संघटनेचे नसून ते जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचे आहे विद्यार्थ्यांकडून नाशिक जिल्हापरिषद समोर दप्तर घ्या, बकऱ्या द्या आंदोलन करण्यात आले आहे. बंद झालेली शाळा सुरू करण्याच्या मागणीसाठी इगतपुरीतील दरेवाडी गावातील विद्यार्थ्यांनी हे अनोखे आंदोलन केलंय. दरेवाडीतील जिल्हा परिषद शाळा बंद केल्याने विद्यार्थ्यांचा शैक्षणिक नुकसान होत होतं, या शाळेत ४० ते ५० विद्यार्थी शिकत होते. मात्र शाळा बंद केल्याने या विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आलाय. त्यामुळे बकरी घेऊन विद्यार्थ्यांचा मोर्चा जिल्हा परिषद कार्यालयावर धडकला. या विद्यार्थ्यांनी थेट नाशिक जिल्हा परिषदेसमोर ‘दप्तर घ्या बकऱ्या द्या, आंदोलन छेडलंय. शालेय विद्यार्थ्यांनी केलेले हे आंदोलन चांगलं लक्षवेधी ठरलं आहे. त्यामुळे आता शिक्षणापासून वंचित राहत असलेल्या या विद्यार्थ्यांची हाक प्रशासन ऐकणार का ? आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न मार्गी लागेल का हे पाहणं देखील आता तितकच महत्त्वाचं ठरणार आहे. शाळा पुन्हा सुरू व्हावी.या गावातील नागरिकांनी देखील मागणी केली आहे.की शाळा लवकर सुरू झाली पाहिजे,कारण विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे,प्रशासन म्हणत आहे की,दुसरीकडे पुनर्वसन झाल्यामुळे शाळा बंद केली आहे.मात्र जे नागरिक पुनर्वसन झालेल्या ठिकाणी गेलेले नाही,त्यांच्या मुलांनी काय करायचं ? शाळा शिकायची नाही का ? जी शाळा अगोदर होती ती सुरू ठेवा,आज जवळपास 40 ते 50 विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे.ज्या ठिकाणी पुनर्वसन झाल आहे,तिथे गैरसोय होत आहे,त्यामुळे आम्ही जात नाही,मात्र शाळेतील विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या नुकसानाला जबाबदार कोण असा प्रश्न गावातील नागरिक साईनाथ गावंडा यांनी उपस्थित केला आहे.