देशमुख आत्महत्या प्रकरणी बदनामी केल्याचा आरोप
प्रतिनिधी, यवतमाळ : नगरपालिकेचे कंत्राटदार विशाल देशमुख याने गत दोन दिवसापुर्वी आत्महत्या केली. यात नगरपालिकेचे तत्कालीन मुख्याधिकारी व अधिकारी यांच्या मानसिक छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप कंत्राटदार संघटनेने केले होता. दरम्यान या प्रकरणावर स्पष्टीकरण देत तत्कालीन मुख्याधिकारी माधुरी मडावी यांनी सर्व आरोप निरर्थक व खोटे असून बदनामी केल्याचा प्रकार असल्याचे सांगितले आहे. याविरोधात 27 जणांविरोधात पोलिसात तक्रार करून कारवाईची मागणी केली आहे. सध्या अमरावती महानगर पालिकेच्या सहआयुक्त माधुरी मडावी यांच्यासह अधिकाऱ्यांवर झालेल्या आरोपांच्या संदर्भात विशाल देशमुख यांच्या आत्महत्येबाबत माधुरी मडावी यांनी भूमिका मांडली.
