प्रतिनिधी, बुलढाणा : तब्बल ११४ वर्षांची परंपरा असलेल्या शांती उत्सवास कोजागिरी पौर्णिमेपासुन सुरुवात करण्यात आली. १२ दिवस मोठ्या भक्तिमय वातावरणात हा उत्सव पार पडत आहे.हा उत्सव देशात केवळ खामगावातच हा उत्सव साजरा होतो.मात्र कोरोनामुळे उत्सव साजरा करण्यात आला नव्हता त्यामुळे भाविकांची पहिल्या दिवसापासूनच खरी रिघ लागली होती.सन १९०८ साली खामगावात या आहे. उत्सवाला सुरुवात झाली. तेव्हापासून देवीच्या ठाण्याचा (जागा) बदलाचा अपवाद वगळता, शांती महोत्सवात कधीही खंड पडलेला नाही.अगदी कोरोना काळातही खामगावात साधेपणाने शांती महोत्सव साजरा झाला. श्री जगदंबा सार्वजनिक उत्सव मंडळाच्या वतीने शहरातील जलालपुरा भागात अनेक वर्षांपासून तर खामगाव शहरात सन १९०८ पासून साजरा होणारा जगदंबा मातेचा उत्सव आता खामगाव शहरासह परिसरातील खेड्यापाड्यात ठिकठिकाणी उत्साहाने शहरात ठिकठिकाणी शांती साजरा करण्याची प्रथा सुरू झाली आहे. तर मोठ्या देवीच्या दर्शनाला राज्यसह परराज्यातून भाविक दर्शनाला येत आहेत.
