जनतेज न्युज

शेतकऱ्यांना आठ दिवसांत मदत न मिळाल्यास प्रहार स्टाईल आंदोलन – आमदार बच्चू कडू

प्रतिनिधी, यवतमाळ : अमरावती जिल्ह्यातील अचलपूर मतदारसंघात नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळी पूर्वी मदत मिळाली. यवतमाळ जिल्ह्यात तलाठी आणि ग्रामसेवकांच्या आंदोलनामुळे मदत वाटपात घोळ झाला. येत्या आठ दिवसात शेतकऱ्यांना नुकसान भरपाई न मिळाल्यास प्रहार स्टाईल आंदोलन करण्यात येईल, असा इशारा आमदार बच्चू कडू यांनी दिला. यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी इशारा दिला. आमदार रवी राणा यांनी पन्नास खोके बाबत आमदार कडू यांच्यावर आरोप केले. त्यांनाही प्रहार स्टाईलने निपटून घेण्याचा इशारा दिला. तर एकनाथ खडसे यांनी केलेल्या विधानावर आक्षेप घेतला. आरोप करताना संहिता पाळली पाहिजे, असा सल्ला ही आमदार कडू यांनी दिला.