जनतेज न्युज

चोपड्यात प्रत्यक्ष पीक पाहणी व चर्चासत्राला शेतकऱ्यांच्या प्रतिसाद

प्रतिनिधी, जळगाव : चोपडा येथे अंकुर सीड व धरती ऍग्रो च्या माध्यमातून चार नोव्हेंबर पासून शेतकऱ्यांसाठी प्रत्यक्ष पीक पाहणी व चर्चा सत्राच्या आयोजन करण्यात आलेले आहे या कार्यक्रमाला जिल्हाभरातून शेतकऱ्यांची उपस्थिती लाभत आहे या चर्चासत्रात शेतकऱ्यांच्या प्रश्नांना तज्ञांकडून मार्गदर्शन करून सोडविण्यात येत आहे तसेच शेतकऱ्यांनी भाजीपाला फळबाजी व इतर वाण ची लागवड कशी करावी त्याच्यावर खत किती कसे द्यायचे फवारणी किती करावी याबद्दल सविस्तर या ठिकाणी माहिती दिली जात आहे त्याचबरोबर प्रत्यक्ष प्लॉट ला भेट देऊन त्या वाणाची माहिती शेतकऱ्यांना मिळत असल्याने अशा या कार्यक्रमाला शेतकऱ्यांनी आवश्यक यावे व आपल्या ज्ञानात भर पाळावे पारंपारिक शेती न करता आधुनिक शेती व अभ्यासपूर्ण शेती केले तर उत्पन्नात कसे वाढ होतं याबद्दल आपल्याला माहिती मिळत असल्याचे शेतकऱ्यांनी प्रतिक्रिया दिली आहे या कार्यक्रमापासून शेतकऱ्यांना बराच लाभ आणि त्यांच्या ज्ञानात भर पडेल असे देखील उपस्थित शेतकऱ्यांनी सांगितले.