प्रतिनिधी , बीड : बीडच्या गेवराई मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने एक आगळं वेगळं आंदोलन करण्यात आलंय.24 डिसेंबर 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवस्मारकाच्या कामाचे भूमिपूजन केले होते.भुमीपुजनाला सहा वर्ष पुर्ण झाले असूनही अरबी समुद्रामध्ये होणाऱ्या शिवस्मारकाचे काम झाले नाही असा सवाल विचारत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने गेवराई मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी व राष्ट्रवादी चे अध्यक्ष शरद पवार यांचा निषेध म्हणुन काळा केक कापला आहे.मनसे कडुन स्वाक्षरी मोहीम ही राबविण्यात येत आहे.तर शहरामध्ये “मग सांगा चुकलं कोण” अशा आशयाचे बॅनरही झळकत आहेत.शिवस्मारक करु म्हणत 13 वर्षे झुलवत ठेवणारे शरद पवार आणी भुमीपुजन करुन सहा वर्षे झाली तरी काम सुरू न करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात मनसे चांगलीच आक्रमक झाल्याचे दिसून आले.
