जनतेज न्युज

ढगाळ वातावरणामुळे केळी पिकासह हरभऱ्यावर बुरशीजन्य रोगाच्या प्रादुर्भाव

प्रतिनिधी , जळगाव : चोपडा तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्याभरामध्ये ढगाळ वातावरण व कडाक्याची थंडी पडू लागली त्याचबरोबर धुक्याची चादर वातावरणात पसरलेली दिसते यामुळे केळी पिकावर व काढण्यात आलेल्या केळीवर चिरी इंजुरीचा प्रादुर्भाव जानहु शकतो करपा बुरशीजन्य रोगाच्या प्रादुर्भाव वाढीसाठी पोषक असं वातावरण आहे. शेतकऱ्यांनी शक्य झालं पाणी भरण्याची वेळ आली तर रात्री भराव आणि कृत्रिम रित्या धुर करता आलं शेतामध्ये तर करपा पासून बचाव करण्यासाठी याचा चांगल्या प्रकारे उपयोग होऊ शकतो त्याचप्रमाणे धुक्यामुळे आणि ढगाळ वातावरणामुळे हरभरा पिकावर अळीच्या आणि मर रोगाचा प्रादुर्भाव आहे का याच्यावर वेळोवेळी लक्ष देणे महत्त्वाचा आहे तसे असल्यास कीटकनाशक फवारणीच्या नियंत्रण मिळवता येऊ शकतो परंतु वाढलेली थंडी गहू पिकासाठी नक्कीच फायद्याची असल्याचे तालुका कृषी अधिकारी दीपक साळुंखे यांनी सांगितले.