जनतेज न्युज

११ तारखेला अमरावती पदवीधर मतदारसंघाचे भाजप चे उमेदवार डॉ रणजित पाटील उमेदवारी अर्ज दाखल करणार

प्रतिनिधी , अमरावती : अमरावती पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार माजी मंत्री डॉ. रणजीत पाटील हे आपला उमेदवारी अर्ज अकरा तारखेला भरणार असून त्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत अमरावती पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार डॉ रणजित पाटील आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. 11 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता अमरावती येथील पी आर पोटे महाविद्यालय संकुलातील सभागृहात अमरावती विभागातील पदवीधरांचा मेळावा आयोजण्यात आला आहे. या मेळाव्याला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे प्रामुख्याने उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.