जनतेज न्युज

ठाणे महापालिकेच्या परिवहन विभागातील टीएमटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू

प्रतिनिधी , ठाणे : ठाणे महापालिकेतील अधिकारी कर्मचाऱ्यांना काही महिन्यांपूर्वीच सातवा वेतन आयोग लागू झाला होता. मात्र ठाणे महानगरपालिके मध्ये मोडणाऱ्या परिवहन म्हणजेच टीएमटी कर्मचाऱ्यांना आता सातवा वेतन लागू करण्यात आला नव्हता. त्यामुळे टीएमटी कर्मचाऱ्यांना देखील सातवा वेतन लागू करावा अशी मागणी परिवहन समिती सभासद विलास जोशी व युनियनचे अध्यक्ष गणेश देशमुख यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व माजी महापौर नरेश म्हस्के यांच्याकडे केली होती. याबाबत अनेक बैठक देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत करण्यात आल्या होत्या, मात्र काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने व माजी महापौर नरेश म्हस्के यांच्या प्रयत्नाने अखेर टीएमटी कर्मचाऱ्यांना देखील सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे.सातवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर टीएमटी कर्मचाऱ्यांना चेहऱ्यावर वेगळाच आनंद पाहायला मिळत होता. काल वागळे इस्टेट येथील परिवहन विभागाच्या डेपोजवळ सर्व कर्मचारी अधिकाऱ्यांनी एकत्रित येऊन फटाक्यांची अतिषबाजी करत ढोल ताशा वाजवत नाचत आनंद उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी परिवहन विभागाचे सभापती विलास जोशी यांच्या कार्यकाळात कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू झाल्याबद्दल त्यांनी महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,माजी महापौर नरेश मस्के, तत्कालीन आयुक्त बिपिन शर्मा आत्ताच्या आयुक्त अभिजीत बांगर या सर्वांचे मनापासून आभार देखील मानले. तसेच सतत कर्मचाऱ्यांसाठी लढणाऱ्या युनियनचे अध्यक्ष गणेश देशमुख यांचे देखील कौतुक केले.