जनतेज न्युज

नायलॉन मांजाचा वापर अथवा विक्री केल्यास कायदेशीर कारवाई होणार

प्रतिनिधी , जळगाव : मकर संक्रांतीच्या काही दिवस आधीच पतंग उडवण्यास सुरुवात होत असते या पतंग उडवण्यासाठी बरेच जण बंदी असलेल्या नायलॉन मांजाचा वापर करत असतात अशा या बंदी असलेल्या नायलॉन मांजामुळे अनेक दुर्घटना झालेले आहेत आणि होण्याची शक्यता देखील असते त्यामुळे मकर संक्रांतीच्या आधीपासून अथवा मकर संक्रांतीला पतंग उत्सव साजरा करत असताना पतंग उडवत असताना नागरिक अथवा युवक यांनी बंदी असलेल्या नायलॉन मांजाचा वापर करू नये आणि विक्रेत्यांनी देखील नायलॉन मांजाचा विक्री करू नये असे जर आढळले अथवा नायलॉन मांजा मुळे दुर्घटना झाली तर असे नागरिक आणि विक्रेते यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी वेळ येऊ नये आपल्यावर यासाठी पतंग उत्सव साजरा करणाऱ्यांनी नायलॉन मांजाचा वापर न करता सुती व कॉटन धाग्याच्या वापर करावा असे आव्हान चोपडा शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित कुमार साबळे यांनी केले आहे .