जनतेज न्युज

सुनिल ईघेंच्या मोकाट मारेकऱ्यांना अटक करा – संध्या खरे

प्रतिनिधी , अहमदनगर : संगमनेर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते सुनील इघे यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्यातील मोकाट आरोपींना अटक करा मागणी करत या प्रकरणातील गुन्हे मागं घ्यावेत म्हनुन खोट्या ॲट्रॉसिट्या दाखल केल्या जात असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या संध्या विलास खरे यांनी संगमनेर येथे केला आहे. खोठ्या ॲट्रॉसिट्या दाखल करून समाजाचा वापर वेगळ्या पद्धतीने करन्यात येतो आहे. ॲट्रॉसिटीच्या गुन्हामागे मोठी आर्थिक घडी प्रस्थापित प्रतिनिधींकडून बसवली जात आहे.यामध्ये समाजाचा बांधवांचा हातनाथ बळी जात असल्याचा आरोप संध्या खरे यांनी करत सुनील इघे यांना न्याय मिळाला पाहिजे व समाजामध्ये तेढ निर्माण करन्याचा प्रयत्न करणाऱ्यावर कारवाई करन्याची मागणी देखील त्यांनी केली आहे.