प्रतिनिधी, अमरावती : आमदार रवी राणा व खासदार नवनीत राणा यांच्या तर्फे स्वाभिमान कृषी महोत्सवाचे आयोजन १२ ते १६ जानेवारी दरम्यान अमरावतीच्या सायन्सकोर मैदानात करण्यात येणार असून, १२ जानेवारीला या महोत्सवाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. दरम्यान, या महोत्सवात रोजगार मेळावा, रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात येणार आहे.हे सरकार लोकांना न्याय देणारं सरकार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळामध्ये शेतकरी, कामगार, शेतमजुर, महिला या प्रत्येक घटकांना न्याय देण्यासाठी हे सरकार काम करत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनामुळे अमरावती मध्ये कृषी महोत्सव साजरी होत आहे. मेळघाट मधील शेतकरी हा अमरावतीच्या मंचावर आला पाहिजे. ज्या बांधावर उध्दव ठाकरे पोहचु शकले नाहीत त्या बांधाव शेतकऱ्यांना पोहचवण्याचे काम आम्ही करत आहोत.
