जनतेज न्युज

जागतिक पारायण दिना निमित्त हजारो भाविकांनी केले गजानन महाराजांच्या पारायनाचे वाचन

प्रतिनिधी, अमरावती : जागतिक पारायण दिनाचे औचित्य साधून व मकरसंक्रांती च्या पर्वावर पी.आर.पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुप अमरावती येथे श्री संत गजानन महाराज विजय ग्रंथ भव्य पारायण सोहळ्याचे आयोजन  करण्यात आले होते. या मंगल पारायण सोहळ्याचे वाचन सौ शीतलताई पुंड  यांच्या सुमधुर वाणीतून करण्यात आले. अमरावती शहरासह जिल्ह्यातील सुमारे ३००० पेक्षा जास्त गजानन महाराज भक्तांनी व विदयार्थ्यांनी या पारायण सोहळ्यामध्ये सहभाग घेतला होता. यावेळी महाप्रसादाचे योजना करण्यात आले होते.