जनतेज न्युज

गडकरींच्या कार्यालयात धमकीच्या कॉल्स प्रकरणात पोलिस प्रशासनाचा तपास सुरू

प्रतिनिधी, नागपुर : शनिवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयातून धमकीचा फोन आल्यानंतर धंतोली पोलिस ठाण्यात आयपीसीच्या कलम 385,387,506,507 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले की, आमची टीम बेळगावी पोहोचली असून तपासात आरोपीने बेळगावी कारागृहातून फोन केल्याचे समोर आले आहे. त्याच्याकडून पोलिस पथकाला एक डायरी मिळाली आहे. 2018 मध्ये आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. कारागृहातून पळून गेल्याचाही गुन्हा आहे, त्याच्याकडे जुने गुन्हे नोंद आहेत. आम्ही कारागृह प्रशासनाकडे चौकशी करत आहोत. आरोपीचे नाव जयेश असून त्याची अनेक नावे असून, तो अजूनही तुरुंगात आहे.