प्रतिनिधी, नागपुर : मकरसंक्रात आनंदाचा उत्सवात पंतगीच्या मांजामुळे वाहन चालकांचा अपघात होऊ नये यासाठी शहरातील विविध भागांतील उड्डाणपूल वाहतुकीस बंद ठेवण्यात आले आहे. शहरातील विविध भागांतील 12 उड्डाणपूल हे वाहतुकीसाठी एक दिवसासाठी बंद करण्यात आल्याची माहिती वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त चेतन तिडके यांनी दिली आहे. पंतंगीच्या आनंदोत्सवात मांजा गळयात अडकून गळा चिरण्याचा तसेच अपघाताचा घटना झालेल्या आहेत. त्यामुळे खबरदारी म्हणून वाहतूक विभागाने उड्डाणपूल सकाळी 6 वाजल्यापासून सायंकाळी 6 पर्यंत वातुकीस बंद ठेवले आहेत.
