प्रतिनिधी, मुंबई : भारताची संस्कृती बहुआयामी आहे. गेल्या पाच सहस्र वर्षांतील भारतातील चालीरीती, भाषा, चालीरीती आणि परंपरा एकमेकांशी असलेल्या परस्परसंवादातील विविधतेचे एक अद्वितीय उदाहरण देतात. भारतात सनातन धर्म, जैन, बौद्ध आणि शीख, सिंधी धर्म यासारख्या अनेक धार्मिक व्यवस्था एकत्र राहतात. यातच वडाळा येथील बर्डि बेबीस शाळेद्वारे आपल्या भारतातील हीच परंपरा अगदी लहानपणा पासून मुलांना सांगून ती जपली जात आहे. ज्या प्रमाणे आपण नेहमीच बोलतो सर्व धर्म एक आहे त्याचे प्रात्यक्षितच या शाळेमध्ये पाहण्यात आले. तसेच या द्वारे एकोप्याने राहण्याचा सामाजिक संदेश विद्यार्थांनी दिला. विध्यार्थींसोबत पालकसुध्दा या कार्यक्रमात सहभागी झाले होते. पालकांच्या चेहर्यावरचा आनंद यावेळी दिसत होता.
