जनतेज न्युज

व्यावसायिकाचे मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन

प्रतिनिधी, धुळे : धुळे शहरालगत असलेल्या अवधान एमआयडीसी परिसरात मोबाईल टॉवर वर चढून एका व्यावसायिकाने आंदोलन सुरू केले आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग क्रमांक – 3 लागत असलेल्या व्यावसायिकांची दुकाने अतिक्रमीत असून ते काढण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाच्या वतीने नोटीस काढण्यात आले आहेत. या कारवाईला विरोध करत व्यावसायिकांनी हे आंदोलन सुरू केले आहे. श्रावण झुंबर जाधव असे टॉवरवर चढलेल्या व्यावसायिकाचे नाव असून मागणी पूर्ण होईपर्यंत खाली उतरणार नसल्याचे आंदोलकाने सांगितले आहे. राष्ट्रीय महामार्ग लगत असलेली दुकाने स्वखर्चाने विकत घेतली असून याची कायदेशीर खरेदी पावती असून ही दुकाने जर अतिक्रमण म्हणून तोडले गेली तर आमच्यावर उपासमारी ची वेळ येईल तसेच उदरनिर्वाहासाठी दुसरा कुठलाही पर्याय राहणार नाही. म्हणून अतिक्रमणाची कारवाई मागे घ्यावी, अन्यथा अतिक्रमणाची नोटीस दिलेल्या व्यवसायिकांना मोबदला देऊन पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी, अशा मागणीसाठी हे आंदोलन करीत असल्याचे आंदोलक व्यावसायिकाकडून सांगण्यात आले आहे.