प्रतिनिधी, मुंबई : सिडकोच्या नैना प्रकल्पा विरोधात प्रकल्पग्रस्थ शेतकऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार उचलले आहे. आज पासून नैना प्रकल्पात समाविष्ट गावे एक एक दिवस करुन गावबंद आंदोलन पुकारणार आहेत. पनवेल तालुक्यातील सुकापूर गावातून या गावबंद आंदोलनाला सुरुवात करण्यात आलेय. नवी मुंबई, पनवेल व उरण मधील २७० पेक्षा अधिक गावे विमानतळ बाधित म्हणून अधोरेखित केली गेली आहेत. येथील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करून सिडको त्या ठिकाणी नियोजित शहर वसविण्याच्या प्रयत्नात आहे. यात स्थानिक प्रकल्पग्रस्थ पूर्णतः देशोधडीला लागणार असल्याचा आरोप नैना प्रकल्पग्रस्थ उत्कर्ष समिती केला असून या आंदोलनाच्या माध्यमातून रोज एक गाव बंद करून सिडको प्रशासनाला खणखणीत इशारा देण्यात येणार आहे.
