जनतेज न्युज

शिवजयंती आनंदात व शांततेत साजरी करावी; पोलीस निरीक्षक आगरकर

प्रतिनिधी, शिरपूर : आगामी शिवजन्मोत्सव साजरा करताना शांततेचा भंग होणार नाही, याची काळजी घेऊन सर्वांनी हा उत्सव आनंदाने साजरा करावा, असे प्रतिपादन पोलीस निरीक्षक अन्साराम आगरकर यांनी केले.येत्या 19 रोजी शिवजन्मोत्सव सोहळा साजरा होत असून या पार्श्वभूमीवर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शांतता समिती व शिवजन्मोत्सव समितीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक शहर पोलीस स्थानकाच्या आवारात आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी पोलीस निरीक्षक बोलत होते. ते म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण सर्वांनी अंगीकारणे गरजेचे आहे. उत्साहाच्या भरात कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोहोचणार नाही याची सर्वांनी काळजी घेणे आवश्यक आहे.उत्सव समितीच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले असून ते उत्तम आहेत. सोशल मिडियाद्वारे कोणाच्या धार्मिक भावना दुखावणार नाही याची काळजी घ्यावी. समितीचे कार्यकर्ते स्वत:हून वर्गणी काढून हा उत्सव साजरा करतात, ही अभिमानास्पद बाब आहे. मिरवणुकीत मद्यपान, मोटरसायकल वर तीन शिट फिरु नये असे आवाहन त्यांनी केले. शिंदे गटाचे शहर अध्यक्ष मनोज धनगर यांनी या काळात दोन दिवस दारूचे दुकान बंद ठेवण्याची मागणी केली.यावेळी व्यासपीठावर पोलीस निरीक्षक अन्साराम आगरकर, PSI किरण बारे PSI मुरकुटे आदी उपस्थित होतेबैठकीस नगरसेवक प्रभाकर चव्हाण, नगरसेवक रोहित रंधे, नगरसेवक हेमंत पाटील, शिवसेनेचे भरत राजपूत, नगरसेवक देवेंद्र राजपूत, रोहित शेटे, नरेंद्र पाटील, मनोज धनगर,कन्हैया चौधरी,राजू टेलर, राष्ट्रवादी चे मनोज महाजन, रमेश करंकाळ,आदी उपस्थित होते.