प्रतिनिधी, अमरावती : काँग्रेस नेत्या व माजी मंत्री आमदार यशोमती ठाकुर यांच्या वाढदिवसानिमित्त अमरावती शहर काँग्रेस पक्षाने यशोमती ठाकुर यांची चक्क गूळतुला करून तो गूळ अमरावती येथील हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ येथील गौरक्षण येथील गाईंना खायला दिला. यावेळी काँग्रेसचे वतीनं संविधान प्रस्ताविका देखील वाटप करण्यात आली.
