जनतेज न्युज

खामगांव सामान्य रुग्णालयात उष्मघात कक्ष कार्यान्वित

प्रतिनिधी, बुलडाणा : गेल्या तीन ते चार दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ होत आहे. राज्यात सर्वाधिक तापणाऱ्या खामगाव शहराचे तापमान ४२ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. परिणामी उष्माघाताच्या रुग्णसंख्येतही भर पडू लागली आहे. त्यामुळे येथील सामान्य रुग्णालयात सद्य:स्थितीत ५ बेडचा उष्माघात कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. सोबतच आवश्यक त्या उपाययोजनाही या कक्षात करण्यात आल्या आहेत. आगामी काही दिवसांत उष्णतेच्या लाटेची शक्यता वर्तविण्यात येत आहे. आरोग्य विभागाकडून सामान्य रुग्णालयासोबतच नागरी आरोग्य केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामीण रुग्णालयात आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. उष्णतेचा तडाखा वाढत असल्याने आरोग्य विभाग सतर्क झाला असून प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात उष्माघात कक्ष स्थापन करण्याचे निर्देश जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिले आहेत. त्यानुसार खामगाव येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात एक कक्ष स्थापन करण्यात आला. या वातानुकूलित कक्षामध्ये पाणी प्राथमिक कीट थंडावा निर्माण करणारी फळे यांचा समावेश आहे. रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक १ च्या मागील बाजूस वातानुकूलित यंत्र बसवून उष्माघात कक्ष स्थापन केला मान्य रुग्णालयात उष्माघात कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. या कक्षात पाच बेडची व्यवस्था असून रुग्णसंख्या वाढल्यास, वाढीव बेडचे नियोजनही उष्माघात कक्षात करण्यात आले आहे. उन्हापासून बचावासाठी नागरिकांनी तोंडाला रुमाल व टोपीचा वापर करावा व महिला व मुलींनी स्कार्फ चा वापर करावा , तर जास्तीत जास्त शीतपेय प्यावे व उन्हात विनाकारण फिरू नये असे आवाहन सुद्धा केले आहे.