प्रतिनिधी, सोलापूर : निराधार महिलांना २१ हजारांचा उत्पन्नाचा दाखला सादर करण्याचा शासनाने नवीन जीआर काढला आहे. त्या निषेधार्थ आज काँग्रेसच्या शहर मध्यच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली, सत्तर फूट रोड येथे शासनाच्या जीआर ची होळी करत शासनाविरोधात बोंबा बोंब आंदोलन करण्यात आले.मागील आठ वर्षात मोदी सरकारने सर्वसामान्यांसाठी कोणत्याही नवीन योजना आणल्या नाही. मात्र नवीन जीआर काढून निराधार योजनेतील लाभार्थी कमी करण्याचे षडयंत्र सुरु आहे. निराधार महिलांना ५१ हजार रुपये उत्पन्नाची आट करण्यात यावी. या मागणीसाठी आमदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
