प्रतिनिधी, संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर, शहराच्या मध्यवर्ती आगारात पहिली इलेक्ट्रिकल बस छत्रपती संभाजीनगर ते पुणे मार्गावरून शिवाई नावाची बस धावणार आहे. आणखी चार बस दाखल होतील म्हणजेच पहिल्या टप्प्यात एकूण पाच ई बस मिळणार आहेत. या बसने प्रवाशांना अवघ्या साडेचार तासात पुणे गाठता येणार आहे. छत्रपती संभाजीनगर विभागाला एकूण 200 बसेस मिळणार आहेत. राज्यात एक जून पासून पुणे अहमदनगर मार्गावर पहिली ही बस सुरू झाली. टप्प्याटप्प्याने त्यांची संख्या वाढण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार छत्रपती संभाजी नगर एसटी विभागाला पहिल्या टप्प्यात पाच बस मिळणार आहेत. आज त्यातील तीन बसेस आले असून या छत्रपती संभाजीनगर ते पुणे चालणार आहे. अशी माहिती विभाग नियंत्रक सचिन क्षिरसागर यांनी दिली. ही बस पूर्ण वातानुकूलित आहे. आरामदायी प्रवास पुशबॅक सिट आहेत. प्रत्येक आसनाजवळ मोबाईल चार्जिंग रीडिंग ,लॅम्पची सोय आहे. बस मध्ये वायफाय दोन स्क्रीन असून दरवाजा स्वयंचलित असणार आहे. या बस मध्ये 45 प्रवासी क्षमता असून भाडे शिवशाही प्रमाणेच असेल एकदा चार्ज केल्यानंतर 350 किमी धावणार आहे. विभागीय कार्यालया शेजारी इलेक्ट्रिक बसेस चार्जिंग सेंटर तयार करण्यात आले आहे. ही बस दीड तासात चार्ज होते. एकदा चार्ज केल्यानंतर 350 किमी धावेल अशी माहिती क्षीसागर यांनी दिली.
