जनतेज न्युज

महाराष्ट्रात सर्व प्रमुख पक्षाला संधी दिली तरीही समस्या कायम,अबकी बार किसान सरकार- के चंद्रशेखर राव

प्रतिनिधी, धाराशिव : बीआरएस पक्ष प्रमुख तथा तेलंगनाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव हे आज पंढरपुर विठ्ठल दर्शनानंतर कुलस्वामीनी आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी तुळजापुर नगरीत मंत्रीमंडळासह आले होते. दर्शनानंतर पत्रकारांशी बोलताना महाराष्ट्रातील सर्व पक्ष आम्हाला ए टीम, बी टीम म्हणतात मात्र मी कोणावरही टिका केली नाही. बीआरएस ही शेतकऱ्यांची टिम आहे. महाराष्ट्राने सर्व प्रमुख राजकिय पक्षांना संधी दिली मात्र मुबलक नैसर्गीक सामुग्री उपलब्ध असताना समस्या कायम आहेत. तेलंगणात बदल होऊ शकतो, तर महाराष्ट्रातच नव्हे तर देशात का नाही. असे म्हणत अब की बार किसान सरकार असा नारा देत आई भवानीकडे शेतकरी सुखी समाधानी होवो असे मागणी मागीतल्याचे के चंद्रशेखर राव यांनी सांगीतले .