प्रतिनिधी, नांदेड : मराठा मेडिकल विद्यार्थी परिषदेच्या वतीने आज जिल्हा नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालयात संमेलन संपन्न झाले. मोठ्या उत्साहाने संपन्न झाले. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर उद्धव भोसले यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचे उद्घाटक संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष शिवश्री प्रवीण दादा गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी वर्ग उपस्थित होता.
