प्रतिनिधी, वर्धा : पोलीस मुख्यालयाचे निर्जन परिसरात जाळून केला नष्ट. आज नूरुल हसन, पोलीस अधीक्षक, वर्धा यांचे अध्यक्षतेखाली स्थापीत डॉ. सागर कवडे, अपर पोलीस अधीक्षक, वर्धा तसेच कांचन पांडे, पोलीस उप अधिक्षक (गृह), वर्धा यांचे ड्रग्ज डिस्पोजल कमिटी समक्ष पो स्टे कारंजा अपराध क्र.327/2022 मधिल (265.325. किलोग्रॅम गांजा) व पो.स्टे. रामनगर अपराध क्र.241/2021 मधिल (149.200 किलोग्रॅम गांजा) असा एकुण 414.525 किलोग्रॅम गांजा नाश प्रक्रियेव्दारे शासकीय पंच साक्षीदारांसमक्ष पोलीस मुख्यालयाचे निर्जन परिसरात जाळून नष्ट करण्यात आला.सदर नाश प्रक्रियेत संजय गायकवाड, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा, कमलाकर घोटेकर, राखीच पोलीस निरीक्षक तसेच पो.हे.कॉ. गिरीश कोरडे 544 व स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदार यांनी सहभाग घेतला.
