जनतेज न्युज

अटाळी येथील अतिक्रमण हटवावे या मागणीसाठी माजी सरपंच सह गावकऱ्यांचे बेमुदत उपोषण

प्रतिनिधी, बुलडाणा : खामगाव तालुक्यातील अटाळी येथे गेल्या अनेक महिन्यापासून गावातील काही नागरिकांकडून अतिक्रमण करण्यात आले आहे, सदर अतिक्रमण काढावे या मागणीसाठी डॉ.दिलीप काटोले माजी सरपंच तसेच समस्त गावकऱ्यांनी पंचायत समिती समोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. अटाळी येथे श्री संत भोजने महाराज व विठ्ठल रुक्मिणी मंदिराला ‘ब’ दर्जा प्राप्त झाला आहे तर संस्थांच्या मुख्यमार्ग  सह इतर तीन रस्ते अतिक्रमण टाकून रस्ते संपूर्णपणे बंद करण्यात आले आहेत… याबाबत उपोषणकर्त्यांनी वेळोवेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत तक्रारी केल्या आहेत ,मात्र कुठलीच दखल या प्रशासनाने घेतली नाही. त्यामुळे माजी सरपंच सह गावकऱ्यांनी पंचायत समिती समोर बेमुदत उपोषण सुरू केले असून आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे.जोपर्यंत मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत हे बेमुदत उपोषण सुरूच राहील असा इशारा यावेळी दिला आहे.