जनतेज न्युज

ठाकुर्ली परिसरात घडली ह़दयद्रावक घटना

प्रतिनिधी, कल्याण : सकाळ पासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाचा फटका मध्य रेल्वेला बसला. रेल्वे सेवा संथगतीने सुरु असल्याने डोंबिवली ते कल्याण रेल्वे स्थानका दरम्यान लोकलच्या रांगा लागल्या. याच दरम्यान एक हृदयद्रावक घटना घडली. लोकल बराच वेळ सुरु असल्याने प्रवाशांनी रुळांवरुन चालत स्टेशन गाठण्याचा प्रयत्न केला. याच दरम्यान दुपारी दुपारी 3 च्या सुमारास भिवंडी मध्ये राहणाऱ्या एका महिला आपल्या नातेवाईकांसह ठाकुर्ली ते कल्याण रेल्वे स्थानकादरम्यान रुळांवरुन चालत प्रवास करत असताना अचानक नाल्याच्या दरम्यान आजोबांच्या हातून चिमुरडी निसटली ती थेट नाल्यात पडली. सध्या या चार वर्षीय मुलीचा शोध कल्याण डोंबिवली लोहमार्ग  पोलिस, रेल्वे पोलीस सह इतर आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून शोध सुरु आहे.