जनतेज न्युज

कोविड-१९ साठी सेवा देताना बाधित झालेल्या शिक्षकांना विशेष सवलत द्या – मनसे आमदार राजू पाटील यांची मागणी

प्रतिनिधी ,अभिजित देशमुख – कल्याण डोंबिवली : कोरोना काळात राज्यातील शहरी व ग्रामीण भागात सर्व्हेक्षणाचे काम करुन कोरोनाला आटोक्यात आणण्यात शिक्षकांनी मोलाचे योगदान दिले आहे. अशा प्रकारे कोविड योद्धा म्हणून सेवा देताना शिक्षकांना अनंत अडचणी आल्या व येत आहेत. या काळात सेवा देताना झालेल्या गैरसोयीबात डोंबिवली येथील एका सहशिक्षिकेने आपला अनुभव व्हिडीओद्वारे कथन केला . याबाबत मनसे आमदार राजू पाटील यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे याना पत्र धाडले असून या पत्राद्वारे कोरोना काळत सेवा देताना बाधित शिक्षकांना उपचार घेताना अनेक अडचणी येत असून त्यांच्याकडून आधारकार्ड, लाईटबील असताना ओरिजनल रेशनकार्डची मागणी करण्यात येत आहे हे दुर्दैवी आहे.वास्तविक कोरोना हा संसर्गजन्य आजार असून जर घरातील एखादी व्यक्ती बाधित झाली तर त्यांच्या घरातील संपूर्ण कुटुंब कॉरंटाईन होते. असे असताना शिक्षक असेल किंवा इतर अत्यावश्यक सेवा देणारे कर्मचारी आणि त्याचे कुटुंबिय अशाप्रकारे कागदपत्रांची पूर्तता कशी करणार, हे अनाकलनीय असल्याचे सांगितले तसेच.राज्य शासनाच्या आदेशानंतरच शिक्षकांना कोविडसाठी काम सुरु केलेले आहे आणि त्यांना सर्व्हेक्षणाचे काम करीत असताना कोविडची बाधा झाली आहे हे नाकारता येणार नाही. त्यांचा हजर रिपोर्टही प्रत्येक दिवसांचा सादर करण्यात येतो. असे असतानाही कागदपत्रांची अडवणूक करुन सुविधा नाकारण्यात येत असतील तर अशामुळे कोविड योद्धांचे मनोबल खच्ची होणार आहे. त्यामुळे राज्यातील कोविडसाठी काम करणाऱ्या शिक्षकांसाठी सुविधा मिळणेबाबत स्वतंत्र परिपत्रक काढण्याची आवश्यकता आहे. तरी कृपया आपण कोविडची बाधा झालेल्या शिक्षकांना त्यांचा हजर रिपोर्ट ग्राह्य धरुन सर्व सोयी सुविधा पुरविण्याबाबत शासनाने परिपत्रक काढावे अशी मागणी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे