प्रतिनिधी , बीड : पारंपरिक शेतीला फाटा देत दुष्काळी भागातील शेतकऱ्यांनी आता कापूस, सोयाबीन पिकांकडे पाठ फिरवत , पडीक शेतीवर फळबाग लागवड करण्याकडे मोर्चा वळवलाय.. कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळ , या संकटातुन बाहेर पडण्यासाठी ,बीडचे शेतकरी आता शेतीत नव नवीन प्रयोग करताना दिसत आहेत..तर यातूनच लाखोंचं उत्पन्न देखील घेत आहेत.अशाच एका शेतकऱ्यांनं , आजोबांनी 40 वर्षांपूर्वी लावलेली चिकूचे बाग जोपासली असून कुटुंबाचा आधार बनली आहे.पाहूयात याच विषयीचा हा स्पेशल रिपोर्ट..!
हे आहेत बीड तालुक्यातील नेकनूर येथील शेतकरी , जयदीप काळे…तर यांच्या सभोवताली असणारी ही चिक्कूची बाग 1980 त्यांच्या आजोबांनी लावलीय.आज या बागेला जवळपास 40 वर्ष पूर्ण झाली आहेत.मात्र आजही बाग बहरते आहे ती जयदीप काळे यांच्या मेहनतीने. वर्षाकाठी लाखों रुपये उत्पन्न देणाऱ्या बाग , कमी खर्च अन अल्पशा मेहनतीवर बहरत आहे.आजपर्यंत त्यांना या बागेतून निव्वळ उत्पन्न जवळपास 25 लाख मिळालं असल्याचं काळे यांनी सांगितलंय.
तर ही बाग पाहून जयदीप काळे यांचे चुलत बंधू संदीप काळे देखील फळबाग लागवडीकडे वळले आहेत.त्यांनी शेतामध्ये गोल्डन कंपनीचे सीताफळ लावले आहे.यामुळं दरवर्षी पारंपरिक शेतीतून होणारं नुकसान , फलबागेतून होत नाही.शिवाय कमी पाणी अन कमी मेहनत असल्याने उत्पन्न काढण्यास अधिक सोप्पं झालंय.असं संदीप काळे सांगतायत.
मराठवाड्यात शेतकरी आज अनेक अडचणींना सामोरे जातोय. मात्र शेतकऱ्यांनी योग्य माहिती, योग्य नियोजन करून प्रगत शेतीची कास धरली तर नक्कीच त्याचा फायदा आर्थिक घडी बसवण्यास होतो.त्यामुळं योग्य नियोजन करून फळबाग जोपासली तर ती कशी आधार बनते, हेच दुष्काळी बीड जिल्ह्यातील काळे यांनी दाखवून दिलं आहे…!
