प्रतिनिधी , बुलडाणा : कोणाच्या पाठीत खंजीर खुपसणे म्हणजे हिंदुत्व नव्हे, असे मत कृषीमंत्री दादा भुसेंनी आज व्यक्त केले. ते बुलडाण्यातील पत्रकार परिषदेत बोलत होते. अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार, आमदार श्रीकांत देशपांडे यांच्या प्रचारासाठी ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती..
शिवसेना पक्ष हा हिंदुत्वापासून कधीच दूर गेला नाही. हिंदुत्व म्हणजे सर्वांना सोबत घेऊन जाणे. कोनाच्या पाठीत खंजीर खुपसणे म्हणजे हिंदुत्व नव्हे, असे मत कृषीमंत्री दादा भुसें यांनी आज व्यक्त केले. ते बुलडाण्यातील पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी वीज बील संदर्भात ही प्रतिक्रीया दिलीय.अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार, आमदार श्रीकांत देशपांडे यांच्या प्रचारासाठी ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.
