जनतेज न्युज

नेर तालुक्यातील पिप्री कलगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

प्रतिनिधी , यवतमाळ : नेर तालुक्यातील पिप्री कलगाव येथे राजू गूलाबराव तूपटकर (56) शेतकऱ्याने स्वतःच्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. त्याच्याकडे चार एकर शेती आहे.
सततच्या नापीकीने ते त्रस्त होता. बोंडअळीने कपाशीची बोंडे सडत असंताना यूनीयन बँकेचे साडेतीन  लाख व सावकाराचे 60 हजाराचे कर्ज कसे फेडावे या विवंचनेत असताना त्याने मध्यरात्री गळफास लावून आत्महत्या केली.