जनतेज न्युज

लव जिहाद चा कायदा आणून भाजपला देशाचे पुन्हा विभाजन करायचे आहे – आ.पृथ्वीराज चव्हाण

प्रतिनिधी , सातारा : साताऱ्यात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची पत्रकार परिषद पार पडली यावेळी बोलताना आ.पृथ्वीराज चव्हाण म्हणाले… लव जिहाद चा कायदा आणून भाजपला देशाचे पुन्हा विभाजन करायचे आहे असे सांगत भाजपवर निशाण साधला..नक्की काय म्हणाले पृथ्वीराज चव्हाण म्हणाले पाहुयात…
मुद्दे –
1 – बिहारमधील निवडणुकीवर बोलताना चव्हाण यांनी शंका व्यक्त केली. निवडणूक घासून झाली असून काय तरी घडलं असल्याच यावेळी त्यांनी सांगितले..

2 – देशाचे पुन्हा विभाजन करायचे ही भाजपची भूमिका आहे.

3 – सुशांतसिंग राजपूत प्रकरण काहीतरी कारण सांगून दिल्लीच्या हातात घ्यायचं त्यामुळे न्याय मिळेल अशी आशा वाटत नसल्याचे चव्हाण म्हणाले.

4 – कोणाची चौकशी होणार नाही आणि सर्व गुंडाळून ठेवायचे आणि दहशतीसाठी याचा वापर करायचे चालू आहे.

5 – विरोधकांना टार्गेट केलं जातं आहे,आमिषे दाखवली गेली आज होणारी कारवाई ही पक्ष बघून आणि विरोधी पक्षाला मोडण्याकरिता कारवाई करत असल्याचे यावेळी सांगितले

6 – ज्या बँका इंदिरा गांधींनी राष्ट्रीकृत केल्या त्या मोठ्या उद्योगपतींना ताब्यात देऊन विक्री करण्याचे काम काम भाजप सरकारचे सुरू आहे