जनतेज न्युज

आम्हाला धमकी देऊ नका , आम्ही पण चळवळीतून आलोय – चंद्रकांत पाटलांचा शिवसेनेला इशारा

प्रतिनिधी , पंढरपूर: उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यांनी त्या पदाला शोभेल असे बोलावे , विनाकारण आम्हाला धमकी देण्याची भाषा करू नये आम्हीपण चळवळीतून आलोय अशी भाषा चालणार नाही असा थेट इशाराच भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत दादा पाटील यांनी मुख्यमंत्री ठाकरेंना दिलाय. सामानाला दिलेल्या मुलाखतीवर त्यांनी तोफ डागली. उद्धव ठाकरेंनी आता घरातूनच समाजजीवन चालवावे असा खरमरीत टोला त्यांनी लगावला.
या महिन्यात महाविकास आघाडी सरकारला सत्तेवर येऊन एक वर्ष झाले, पण या वर्षात समाजातील एकही घटक समाधानी नाही. सर्वच स्तरावर हे सरकार अपयशी ठरले आहे. महाविकास आघाडीतील तीन पक्षांचा एकमेकांवर विश्वास नाही . ऊर्जामंत्री नितीन राऊतांनी त्यांच्या विभागाबद्दल बोलावे आणि जनतेची कामं करावीत असा सल्ला त्यांनी उर्जा मंत्र्याना दिलाय.
सध्या पदवीधर आणि शिक्षक मतदारासंघाच्या निवडणुकांच्या प्रचार सुरये. यामध्ये महाविकास आघाडीचे नेते आपले कामं जनतेसमोर न मांडता फक्त माझ्यावरच टीका करतात. विरोधकांना आता चंद्रकांत पाटील नावाची गोळी दिवसातून पाच वेळा घेतल्याशिवाय झोप लागत नाही असा टोला त्यांनी लगावला.