जनतेज न्युज

देशातल्या कामगार कायद्यात जे बदल होत आहेत ते घातक असल्याचा आरोप करत देशातील कामगार संघटनांनी केंद्र सरकारविरुद्ध आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.

प्रतिनिधी , संविधान दिनाचा मुहूर्त साधत म्हणजेच आज 26 नोव्हेंबरला देशातल्या अनेक कामगार संघटनांनी केंद्र सरकारविरोधात देशव्यापी बंदचे आवाहन केले आहे. कामगार संघटनांनी विविध हक्कांसाठी हे पाऊल उचलले आहे.
शेती क्षेत्रातले जे तीन महत्वाचे कायदे मोदी सरकारने नुकतेच मंजूर केले त्यामुळे नाराज असलेल्या शेतकरी संघटनाही या बंदला पाठिंबा देणार आहेत. देशातल्या दहा केंद्रीय कामगार संघटना तसेच 35 फेडरेशन यात सहभागी होणार आहेत. जवळपास 25 कोटी कर्मचारी यात सहभागी होतील असा दावा केला जात आहे.
आज हेच आंदोलन दादरच्या कोतवाल उद्यानात झालं या आंदोलनात डाव्या आघाडीच्या आयटक च्या कामगार संघटनांनी आज आंदोलन पुकारलं होत या आंदोलनात महिलांची संख्या लक्षणीय होती आणि घरकाम करणाऱ्या महिला संघटनेच्या महिलांनी जास्त करून या मध्ये आपला सहभाग नोंदवला होता तसेच कॅमुनिस्ट पार्टी चे मुंबई चे सेक्रेटरी प्रकाश रेड्डी आणि आयटक चे जनरल सेक्रेटरी एकनाथ माने हे उपस्थित होते.
आज या आंदोलनात महिलांनी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा बाजी केली आणि केंद्राच्या अवाजवी कारभारा विरोधात आवाज उठवला आणि जर महिलांच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर यापेक्षा ही तीव्र अस अनोदलन करू हा इशारा या वेळेस महिलांनी दिला.