पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकी करता जिल्हा प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे. कोरोणाच्या पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी घेऊनच मतदाराला मतदान केंद्रात प्रवेश दिला जाणार आहे. यासाठी मतदान केंद्राबाहेर सॅनिटायझर त्याचबरोबर हॅन्ड क्लोज यांचा वापर करणे बंधनकारक राहणार आहे. याशिवाय मतदानासाठी येणाऱ्या प्रत्येक मतदाराला मतदान केंद्राच्या ठिकाणी मास्क देखील दिला जाणार आहे.
प्रतिनिधी , पुणे : पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदार संघासाठी 1 डिसेंबर रोजी सकाळी 8 ते सायंकाळी पाच या वेळेत मतदान होणार आहे. यासाठीची जिल्हा प्रशासनाची सर्व तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी सतीश धुमाळ यांनी दिली. जिल्ह्यातील 281 केंद्रावर मतदान होणार आहे. मतदानासाठी कर्मचाऱ्यांना आवश्यक ते प्रशिक्षण देखील देण्यात आलय. याशिवाय प्रत्येक मतदान केंद्रावर एक अधिकार, त्याचबरोबर सुरक्षिततेसाठी पोलीस दल नियुक्त असणार आहेत. मतदान केंद्राच्या बाहेर पोलिस यंत्रणा आणि गृहरक्षक दल यांची नियुक्ती देखील केली जाणार आहे. शिक्षक मतदार संघासाठी पांढऱ्या रंगाची तर पदवीधर मतदार संघासाठी गुलाबी रंगाची मतपत्रिका असणार आहे. तर मतदानासाठी निवडणूक आयुक्तांनी ठरवून दिलेल्या जांभळ्या रंगाच्या केच पेनचाच वापर करावा लागणार आहे. दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मतदान होत असल्याने, पुरेशी काळजी घेतली जाणार आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर थरमल स्क्रीनिंग मशीनने तपासणी करूनच मतदाराला प्रवेश दिला जाणार आहे. शिवाय सॅनिटायझर त्याचबरोबर हॅन्ड क्लोज याचा वापर करणे बंधनकारक राहणार आहे. याशिवाय मतदानासाठी येणाऱ्या प्रत्येक मतदाराला मतदान केंद्राच्या ठिकाणी मास्क देखील दिला जाणार आहे. यासाठी आवश्यक असणारे साहित्याचं वाटपही आज करण्यात आल. दरम्यान मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर सर्व मतदान केंद्रावरील मतपेट्या व्ही टी पाटील सभागृह येथे एकत्र करून पोलीस बंदोबस्तात पुणे येथे मतमोजणी साठी नेण्यात येणार आहेत.
