जनतेज न्युज

इंदापूर रस्त्यावर अपघातात ऊस मजूर जागीच ठार..

बेलवाडी येथील घटना…ट्रक चालकाने बैलगाड्यांना दिली ठोकर ..एक बैल ठार तर चार बैल जखमी…भाऊराव उत्तम कांबळे अपघातात ठार झालेल्या ऊस तोड मजुराचे नाव.. पहाटे झाला अपघात…

प्रतिनिधी , बारामती : पोटासाठी कोसोदुर येवून धडपडणार्‍या ऊसतोड मजुरांचा बारामती इंदापूर राज्य महामार्गांवर इंदापूर तालुक्यातील बेलवाडी येथे अपघातात मृत्यु झालाय ..
पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील भवानीनगर येथील छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या बैलगाड्या बेलवाडी – थोरातवाडी परिसरातील उस तोडणी करण्यासाठी आज पहाटे निघाले असताना ट्रक चालकाने भरधाव वेगात येऊन चार बैलगाड्यांचा जोराची धडक दिलीय ..
यामध्ये एक ऊसतोड मजूर जागीच ठार झाला एक बैलही मृत्युमुखी पडला तर चार बैला जखमी झाले आहेत .
भाऊराव उत्तम कांबळे गाव महिदा तालुका आष्टी जिल्हा बीड असे मुख्य पडलेल्या ऊसतोड मजुराचे नाव आहे..
रस्त्यावरील बेलवाडी ओढ्यावरिल पुलावर हा अपघात झाला असून अतिशय वेदनादायी घटना असल्याने हळहळ व्यक्त होत आहे..