जनतेज न्युज

उदयनराजेंनी मराठा समाजाचे नेतृत्व करावे -आमदार शशिकांत शिंदे.

प्रतिनिधी , सातारा : साताऱ्यात आ. शशिकांत शिंदे यांनी मराठा आरक्षणा बाबत उदयनराजेनी घेतलेल्या पत्रकार परिषदेच्या मुद्द्यांना उत्तर दिले आहे.देवेंद्र फडणवीसांना पुन्हा मुख्यमंत्री करा अशी मागणी उदयनराजे भोसले यांनी केली होती यावर बोलताना शिंदे म्हणाले 5 वर्ष देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच सत्ता होती मग मराठा आरक्षणाचा विषय का मार्गी लागला नाही? मराठा समाजाच आरक्षणाचे राजकारण करण्याची भाजपची कूटनीती असल्याचे सांगत उदयनराजेंनी मराठा समाजाचे नेतृत्व करावे असे अनेक मराठा संघटना आणि नेत्यांना वाटत असताना देखील खा.उदयनराजे मराठा समाजाचे का नेतृत्व का करत नाहीत असा सवाल शिंदे यांनी खासदार उदयनराजेंना केला आहे. 
मुद्दे 
पवारांवर टीका करून जाणीवपूर्वक राजकारण करण्याचा प्रयत्न
काही लोकांना पुढे करून राजकीय रंग देण्याचा प्रयत्न
मागच्या कालावधीत bjp ने सर्व संस्थ मोडीत काढल्या
समाजाचे राजकारण आपल्या बाजूने करून देशात अस्थिरता करण्याचा भाजपचा प्रयत्न
5 वर्ष फडणवीसांच्या सरकारने मराठा समाजाला कितपत न्याय देण्याचा प्रयत्न केला?
कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे ही मागणी
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर प्रश्न सुटेल का?
केंद्रातील नेत्यांनी मराठा समाजाला न्याय द्यावा
सुप्रीम कोर्टात गेलेला मराठा आरक्षणाचा निर्णय शरद पवारांच्या हातात आहे का?
समाजामध्ये अस्थिरता निर्माण कराचे आणि आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न bjp करत आहे
वकिलाने बाजू मांडण्यासाठी उपस्थित न राहण्याचे फडणवीसांनी सांगितले असल्याचा आरोप
कूट नितीमुळे मराठा समाजाच्या आंदोलनाला डाग लागू नये
भाजप काय करू शकते हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे
कोणाच्या सांगण्यावरून हे जाणीवपूर्वक केलं जातं आहे का?
चांद्रकांत पाटलांनी केंद्रात जाऊन पुढाकार घ्यावा
राजकारण विरहित आंदोलन करण्याची आमची भूमिका आहे
सातारा पालिकेत राष्ट्रवादी निवडणूक लढवणार