जनतेज न्युज

शिक्षक मतदार संघासाठी बुलढाण्यात मतदानाला सुरुवात…. 27 उमेदवारांचे भाग्य ठरणार…

प्रतिनिधी , बुलडाणा : अमरावती विभाग शिक्षक मतदार संघासाठी आज बुलढाण्यात मतदानाला सकाळी 8 वाजतापासुन सुरुवात झालीय.
बुलढाणा तहसील कार्यालयात दोन मतदान केंद्र असून या मतदान केंद्रावर 1152 मतदार मतदान करणार आहेत…

व्हीओ- अमरावती विभाग शिक्षक मतदार संघासाठी आज 1 डिसेंबर रोजी बुलढाणा जिल्ह्यातील 14 मतदान केंद्रावर मतदान सुरू झाले असून जिल्ह्यात 7422 शिक्षक मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
आज सकाळी 8 वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली असून हे मतदान पाच वाजेपर्यंत चालणार असणार आहे.मतदार संघासाठी प्रत्येक तालुक्यात एक आणि मतदारांची संख्या जास्त असल्याने बुलढाणा तालुक्यात दोन मतदान केंद्र उभारण्यात आले आहेत.
मतदानासाठी 13 सदस्यांची 14 पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे..प्रत्येक तालुक्यातील तहसील मध्ये मतदान केंद्र असून मतदान केंद्रावरील पथकांमध्ये केंद्राध्यक्ष एक शिपाई एक पोलीस 2 आरोग्य पथकातील तीन व्यक्ती मायक्रो ऑब्झर्वर एक डाटा ऑपरेटर एक महसूल सहाय्यक एक अश्या पाच जणांची तीन पथके राखीव ठेवण्यात आली आहेत. मतदान केंद्रावर आरोग्य विभागाची पथकेही ही नियुक्त करण्यात आली आहेत. प्रत्येक मतदाराचे तापमान व ऑक्सिजन तपासणी केल्या जात आहे. लक्षणे आढळून आलेल्या रुग्णांना त्यांना विलगीकरण करण्यात येणार आहे. तसेच कोविड बाधित मतदार विलगीकरण आत असलेल्या मतदारांना पोस्टल बॅलेट उपलब्ध करून देण्यात आले आहेत.यावेळी बुलडाण्याचे जिल्हाधिकारी एस.राममुर्ती यांनी मतदान केंद्राला भेट दिलीय..