प्रतिनिधी , सातारा : शेतकरी आत्महत्याचा कलंक पुसण्यासाठी जनप्रबोधन यात्रा येत्या 28 नोव्हेंबर ला काढण्यात येणार आहे.. ही यात्रा प्रत्येक जिल्ह्यात जाऊन शेतकऱ्यांना मेळावा घेण्यात येणार आहे.. आणि 12 डिसेंबर ला सातारा मध्ये या यात्राची सांगता होणार असल्याचे शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांनी सांगितले ते आज सांगली मध्ये प्रसार माध्यमांशी बोलत होते…
यात्रा काढण्या मागचे उद्देश की देश्यात होणाऱ्या शेतकरी आत्महत्याचा कलंक पुसण्यासाठी ही यात्रा निघत आहे.., सर्व शेतकऱ्यांना कर्जातून मुक्त करा, वीज बिलातून मुक्त करा, शेतकऱ्यांना बझाराचे आणि तंत्रज्ञानाचे स्वतंत्र द्या, गाईच्या दुधाला 40 रुपये आणि म्हशीच्या दुधाला 60 रुपये भाव मिळावा, आणि उसाला एक रकमी एफ आर पी आणि अंतिम भाव 4 हजार या अश्या अनेक मागण्यांसाठी ही यात्रा काढण्यात येणार आहे…,
