जनतेज न्युज

कल्याण मधील धक्कादायक घटना

मालमत्तेसाठी पत्नी , मुलगा, पुतण्या आणि भाच्याकडुन बेदम मारहाण
प्रतिनिधी , कल्याण डोंबिवली : वडिलोपार्जित मालमत्तेच्या लालसेपोटी एका इसमाला त्याच्याच पत्नी ,मुलासह भाचा व पुतण्याने राहत्या घरातच डांबून ठेवत बेदम मारहाण करत केल्याची धक्कादायक घटना कल्याण पूर्वेत उघडकीस आली आहे .या प्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात दाखल तक्रारी नुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करत पत्नी दुर्वा सुरेश पावशे,मुलगा निखील पावशे ,पुतण्या स्वप्नील पावशे ,भाचा पुष्कर सुतार याला अटक केली आहे
कल्याण पूर्वेकडील चिंचपाडा परिसरात राहणारे सुरेश पावशे यांच्याकडे वडिलोपार्जित मालमत्ता आणि पैसा अशी लाखोंची मालमत्ता आहे .या मालमत्तेच्या लालसेपोटी व त्यांनी आपल्याला द्यावी यासाठी त्याची पत्नी, मुलगा, पुतण्या आणि भाच्याने सतत मागणी केली होती. मात्र त्याने नकार दिल्याने त्याला त्यांनी 10 दिवस डांबून ठेवत बेदम मारहाण केली आहे. या मारहाणीत त्यांच्या उजव्या हाताला फ्रॅक्चर झाले असून याप्रकरणी सुरेश यांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.दरम्यान मालमत्तेच्या हव्यासापोटी घडलेल्या या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे