जनतेज न्युज

शरद पवार यांच्याबद्दल ते वक्तव्य म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादीत भांडण लावण्याचा प्रयत्न-हसन मुश्रीफ

प्रतिनिधी , कोलापूर : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना यूपीएचे अध्यक्ष करण्याची चर्चा सुरू होती. मात्र पवार साहेबांनी त्याचे खंडन केले आहे. हे वक्तव्य म्हणजे राष्ट्रवादी आणि काँग्रेस मध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न आहे. अशी प्रतिक्रिया ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. केंद्रात आघाडी झाली तर शिवसेनेला सोबत घेण्यासाठी प्रयत्न राहील, असे देखील मुश्रीफ म्हणाले. ते कोल्हापुरात बोलत होते. पुढे ग्रामविकासमंत्री मुश्रीफ म्हणाले, पदवीधर व शिक्षक निवडणुकीत भाजपला पराभवाचा फटका बसला आहे. या धक्क्यातून सावरण्याचा प्रयत्न येणाऱ्या महापालिका निवडणुकीत भाजप आणि चंद्रकांत पाटील करतील असा टोला देखील मुश्रीफ यांनी लगावला.