जनतेज न्युज

हिंगोलीत शिवसेनेचा इंधन दरवाढीविरोधात मोर्चा, दानवेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याला मारले जोडे

प्रतिनिधी , हिंगोलीत : हिंगोलीत आज शिवसेनेच्या वतीने इंधन दरवाढीविरोधात भव्य मोर्चा काढण्यात आला. शहरातील गांधी चौक येथे आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वात निदर्शन देखील करण्यात आले. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांविषयी काढलेल्या अपशब्दाचा समाचार घेत शिवसैनिकांनी दानवेंच्या प्रतीकात्मक पुतळ्याला जोडे हाणून आपला निषेध व्यक्त केला. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी जिल्हाभरातून शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. यावेळी बोलताना शिवसेनेचे आमदार तथा जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांनी दानवे यांचा अतिशय तीव्र शब्दात निषेध केला.