प्रतिनिधी , मुंबई : मुंबईच्या विकासाकामांमध्ये भाजप अडथळा आणण्याचे काम करत आहे. मेट्रो कारशेड कांजुरमार्ग येथील जमीन राज्य सरकारची असतानासुद्धा भाजपकडून वारंवार ही जागा केंद्राची असल्याचे बोलले जात होते पडलेलं सरकार असताना केंद्र सरकारमधील मंत्री उज्वल यांनी ही जागा महाराष्ट्र सरकारला देण्यात यावी असे पत्र लिहिले होते मात्र त्यानंतर ठाकरे सरकार आल्यानंतर केंद्र सरकारने आपली भूमिका बदलली मुंबईचा विकास व्हावा असे भाजप सरकारला वाटत नाही त्यामुळे अशा प्रकारचे अडथळे निर्माण करण्यासाठी केंद्र सरकार तथा स्थानिक भाजप नेत्यांकडून प्रयत्न करण्यात येत असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.
