जनतेज न्युज

कोविड काळात कोविडने मृत्यू झालेल्या 5 महापालिका कर्मचाऱ्याच्या वारसांना प्रत्येकी 10 लाख मदतीचे वाटप.

प्रतिनिधी , सोलापूर : कोविड काळात काम करत असताना कोविडने मृत्यू झालेल्या 5 महापालिका कर्मचाऱ्याच्या वारसांना प्रत्येकी 10 लाख मदतीचे वाटप आज करण्यात आले. यासाठी मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी विशेष लक्ष देऊन मृत कर्मचाऱ्याच्या वारसांना वेळेत मदत मिळेल अशी व्यवस्था केली होती. त्यानुसार आज 5 कर्मचाऱ्याच्या वारसांना
प्रत्येकी 10 लाखाच्या मदतीचे धनादेश महापौर गीताताई सुतार यांच्याहस्ते आणि उपायुक्त राहुल रोकडे यांच्या उपस्थितीत देणेत आले.
कोविड 19 च्या काळात महापालिका सेवेत कर्तव्य बजावत असताना 10 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. या सर्व कर्मचाऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी 10 लाखाची मदत देण्यासाठी मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी पुढाकार घेत यापूर्वीच 5 कर्मचाऱ्याच्या वारसांना प्रत्येकी 10 लाखाचा धनादेश सुपूर्त केला होता. तर उर्वरित 5 कर्मचाऱ्यांच्या वारसांना आज महापौर गीताताई सुतार यांच्याहस्ते प्रत्येकी 10 लाखाचे धनादेश देणेत आले. यावेळी सर्वच वारसांनी आयुक्त नितीन कापडणीस यांचे आभार मानले. यावेळी उपमहापौर आनंदा देवमाने, स्थायी सभापती पांडुरंग कोरे, प्रभाग दोनच्या सभापती अप्सरा वायदंडे, जेष्ठ नगरसेवक जगन्नाथ ठोकळे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी वेळेत सर्वच कर्मचाऱ्याच्या वारसांना मदत उपलब्ध करून दिल्याबद्दल आयुक्त नितीन कापडणीस आणि प्रशासकीय यंत्रणेचे संघर्ष सफाई कामगार संघटनेकडून डॉ महेशकुमार कांबळे यांनी आभार मानले. या कार्यक्रमास सहायक आयुक्त सहदेव कावडे, आरोग्यधिकारी डॉ रवींद्र ताटे, वित्त व लेखाधिकारी स्वप्नील हिरगुडे, आस्थापना अधिकारी अनिल चव्हाण, नवीन संबोधी, प्रियांका जाधव अश्विनी पोरे, सचिन सागावकर, संगय्या मठड आदी उपस्थित होते.