प्रतिनिधी , कोल्हापूर : सांस्कृतिक मंत्रालय केंद्र शासन यांच्याकडून करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई मंदिराकडे आय पी पब्लिक अँड्रेस सिस्टिम आणि मेसेज डिस्प्ले सिस्टीम करिता निधी उपलब्ध झाला होता. त्या निधीतून आय पी पब्लिक अॅड्रेस सिस्टीम आजपासून कार्यान्वित करण्यात आली. त्याच उदघाटन खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केली. याचा समारंभ आज श्री करवीर निवसानी श्री अंबाबाई मंदिरात पार पडला.
